Suraj Chavan Income : ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन सुरु झाल्यापासून या शोची चर्चा जोरात आहे. हा कार्यक्रम लवकरच लोकप्रिय होत आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील १६ स्पर्धक हे एकापेक्षा एक आहेत. या सीझनमध्ये अभिनेता नसून अनेक रील स्टार, कीर्तनकार, आणि मॉडेल यांना संधी मिळाली आहे. या सीझनमध्ये रील स्टार सुरज चव्हाण स्पर्धक आहे. सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर असलेल्या सूरज चव्हाणने टिक टॉक आणि नंतर इन्स्टाग्रामवरील रील्सद्वारे लोकप्रियता मिळवली आहे.
‘गुलिकत धोका’ असे आपल्या खास शैलीत बोलणारा सूरज सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय आहे. त्याच्या विनोदी व्हिडीओंना चांगला प्रतिसाद मिळतो. मोबाईलवर रील बनवणाऱ्या सूरजने थेट ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले. सूरजने ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला असला तरी त्याचा प्रवास सोपा नव्हता. आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर त्याच्या बहिणींनी त्याची काळजी घेतली. शिक्षण घेतानाच मोलमजुरी करत त्याने घरची जबाबदारी निभावली.
गुलाबी शरारा गाण्यावर शिक्षकेचा विद्यार्थिनी सोबत भन्नाट डान्स 👇
त्यानंतर सूरजला टिक टॉक अॅपबद्दल कळलं, आणि त्याचे आयुष्य बदलले. बहिणीच्या मुलाने त्याला टिक टॉक अॅपची ओळख करून दिली. त्याने बहिणीसोबत एक व्हिडीओ शेअर केला, जो तुफान व्हायरल झाला, आणि हळूहळू त्याला गांवखेड्यात प्रसिद्धी मिळू लागली. टिक टॉकवरील व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे त्याला लोकप्रियता मिळाली. नंतर त्याने अनेक कार्यक्रमांच्या उद्घाटनासाठी निमंत्रणे स्वीकारली. प्रसिद्धीचा उपयोग करत असताना, त्याला अनेकांनी फसवले.
या मानधनाबाबत सूरजने ‘बिग बॉस’च्या घरात खुलासा केला आहे. तो इतर स्पर्धकांसोबत बोलताना म्हणाला की, “टिकटॉकच्या काळात मला दिवसाला रिबिन कापायला ८०,००० रुपये मिळायचे. आताही मी एका दिवसाचे ३० ते ५० हजार रुपये घेतो. सुरुवातीला पैसा बघून मला लोकांनी खूप फसवलं. त्यामुळे माझ्या बहिणी नेहमी म्हणतात की, तू फक्त नीट राहा, आम्हाला बरं वाटेल.” सूरजचं मानधन ऐकून इतर स्पर्धक आश्चर्यचकित झाले.