Stunt Viral Video : या व्हिडिओत आपण पाहू शकता की, एक तरुण गडाच्या तटबंदीवर चढून मागे उडी मारतो आणि पुन्हा तोल सावरून उभा राहतो. सोशल मीडियावर अनेकदा असे धोकादायक स्टंटचे व्हिडिओ व्हायरल होतात, ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. अशा स्टंटमुळे अनेक जण आपला जीव गमावतात. नुकताच असाच एक धोकादायक व्हिडिओ व्हायरल झाला असून, तो पाहून अनेकांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सोशल मीडियावर नवनवीन ट्रेंड्सवर अनेकांचे लक्ष असते, आणि लोक त्यानुसार गाणी, रील्स, व्हिडिओ तयार करतात. सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एक तरुण स्वतःचा जीव धोक्यात घालून स्टंट करत आहे. या व्हिडिओवर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओत एक तरुण गडाच्या तटबंदीवरून उंच उडी मारताना दिसतो, जिथे तोल गेल्यास त्याला गंभीर इजा होण्याची शक्यता होती. हा धोकादायक स्टंट पाहून अनेक युजर्स संताप व्यक्त करत आहेत. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @iabhi.choudhary या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्याला तीन दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि दोन लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्सनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
या व्हायरल व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, “भावा, एक दिवस असा धोका घेऊन जाशील; जरा सांभाळून.” दुसऱ्याने म्हटले, “एकच आयुष्य आहे, असा जीव धोक्यात घालू नको.” तिसऱ्याने लिहिले, “बहुतेक यमराज सध्या झोपले आहेत,” तर चौथ्याने हा स्टंट “खूपच खतरनाक” असल्याचे म्हटले आहे.