राज्य अधिकारी/कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2024 च्या पगारात तिहेरी लाभ, वेतनात तब्बल 8060/- रुपये वाढ

State Employees Salary Increase News : राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे; कारण राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2024 मध्ये वेतनात तिहेरी लाभ मिळणार आहे.

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी 2024 पासून 4 टक्के महागाई भत्ता वाढ मंजूर करण्यात आलेली आहे. त्यामुळे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50 टक्के महागाई भत्ता मिळत आहे.

4% महागाई भत्ता वाढ

केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखील 4% (DA) महागाई भत्ता वाढ जुलै 2024 पासून अपेक्षित आहे. त्यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2024 पासून 50 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे.

महागाई भत्ता फरक

तसेच या महागाई भत्ता वाढीमुळे मागील जानेवारी ते जून असे एकूण 6 महिन्याची महागाई भत्ता थकबाकी ही जुलै महिन्याच्या वेतनात अदा करण्यात येणार आहे.

वार्षिक वेतनवाढ

माहे जानेवारी – जुलै मध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात वार्षिक वेतनवाढ करणेबाबत नियम आहे. ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही माहे जानेवारी ते जुलै दरम्यान आहे त्यांची वार्षिक वेतनवाढ ही माहे जानेवारी करण्यात येते; तसेच माहे जुलै ते डिसेंबर अशी ज्यांची नियुक्ती आहे त्यांची माहे जुलै मध्ये वार्षिक वेतनवाढ करण्यात येते.

अशी होणार वेतनात वाढ

उदा. समजा, तुमचे मुळवेतन 26,000/- आहे, म्हणजेच मुळवेतनाचे 4% महागाई भत्ता वाढ म्हणजे 1040/- आणि 6 महिन्याचा फरक मिळून एकूण 7280/- रुपये

तसेच वार्षिक वेतनवाढ ही मूळ वेतनाच्या 3% म्हणजेच 780/- (800/- रुपये) वाढ होईल

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा वेतनात एकूण 8060/- रुपये वाढ होईल.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment