या व्हिडीओमध्ये दोन तरुण हायवेवर स्केटिंग करताना दिसतात, आणि ते एका चालत्या ट्रकसोबत स्केटिंग करत आहेत.
हल्लीच्या तरुण-तरुणींची सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी जीवघेणे स्टंट करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यात दोन तरुण हायवेवर धावत्या ट्रकसोबत स्केटिंग करताना दिसत आहेत. असे व्हिडीओ क्षणात लाखो व्ह्यूज आणि लाइक्स मिळवतात, पण यामुळे अनेकदा त्यांना आपला जीव धोक्यात घालावा लागतो.
गुलाबी शरारा गाण्यावर शिक्षिकेचा विद्यार्थिनीं सोबत भन्नाट डान्स 👇
या व्हिडीओमध्ये दोन तरुण हायवेवर स्केटिंग करताना दिसतात, आणि ते एका चालत्या ट्रकसोबत हे करत आहेत. एक तरुण कधी ट्रकच्या मागील बाजूला पकडून स्केटिंग करतो, तर कधी ट्रकच्या खालून जातो, तर दुसरा तरुण त्याचा व्हिडीओ शूट करतो. हा व्हिडीओ पाहून नेटकरी खूप नाराज झाले आहेत.व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने लिहिले आहे की, “जर हे तरुण ट्रकच्या चाकाखाली आले असते, तर त्यांच्या कुटुंबीयांनी ट्रकचालकावर केस केली असती, पण यामुळे त्यांच्या शरीराचा एकही अवयव शिल्लक राहिला नसता. अशा बेफिकीर वागणुकीमुळे लोक संकटात येतात, त्यामुळे कारवाई करायला हवी.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे, @निशांत शर्मा (भारद्वाज) नावाच्या अकाउंटवर तो शेअर करण्यात आला असून, त्याला आठ लाखांहून अधिक व्ह्यूज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत.