पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याना आर्थिक मदत केली जाते ,या योजनेद्वारे पात्र शेतकारींना आर्थिक दिलासा दिला जातो ,
मात्र या योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. या योजनेचे खाते अपडेट करा म्हणून लिंक चा मेसेज येतो ,आणि शेतकऱ्यांच्या बँकेचे खाते रिकामे होत, असल्याच्या तक्रारी सायबर सेल कडे दररोज प्राप्त होत आहेत .
त्यामुळे अश्या फसव्या लिंक्स पासून सावध राहण्याचे आव्हान पोलिसांनी केले आहे .
अजून कसे कसे स्कॅम आपल्या सोबत होऊ शकतात ते पाहूया ;
- बनावट नोंदणी आणि कागदपत्रे जमा करणे : काही फसवणूक करणारे एजंट शेतकऱ्यांना योजनेत नोंदणी करण्यासाठी पैसे घेतात आणि बनावट कागदपत्रे तयार करतात. यातून त्यांना आर्थिक फसवणूक होते.
- आधार आणि बँक खाते माहितीचा गैरवापर : काही फसवणूक करणारे शेतकऱ्यांची आधार कार्ड आणि बँक खाते माहिती घेतात आणि त्यांच्या नावे बनावट नोंदणी करून अनुदानाची रक्कम स्वत:च्या खात्यात वर्ग करतात.
- ऑनलाइन फसवणूक : शेतकऱ्यांना SMS किंवा फोनद्वारे फसवणूक करणाऱ्या व्यक्ती संपर्क साधतात आणि त्यांना योजना अंतर्गत मिळणारी रक्कम मिळवण्यासाठी त्यांच्या वैयक्तिक माहितीची मागणी करतात. यातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यातील रक्कम चोरीला जाऊ शकते.
- खोट्या वेबसाईट्स आणि अॅप्स : काही फसवणूक करणारे बनावट वेबसाईट्स आणि मोबाईल अॅप्स तयार करून त्यावर शेतकऱ्यांची नोंदणी करून घेतात. यामुळे शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती आणि आर्थिक नुकसान होते.
या स्कॅम पासून कसे वाचावे:
- सरकारी वेबसाईट वापरा : केवळ पीएम किसान योजना च्या अधिकृत वेबसाईटवरच नोंदणी करा आणि त्यातील माहितीची खात्री करूनच पुढे जा.
- तिसऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका : नोंदणीसाठी कोणालाही पैसे देऊ नका किंवा कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला आपली वैयक्तिक माहिती सांगू नका.
- ऑनलाइन व्यवहार सुरक्षित करा : आपल्या बँक खाते माहिती किंवा आधार क्रमांकाची माहिती फक्त अधिकृत वेबसाईटवरच भरावी.
- सतर्क रहा : कोणत्याही SMS, फोन कॉल किंवा ईमेलमध्ये येणाऱ्या माहितीबद्दल सतर्क राहा आणि ती पडताळून पाहा.