RBI RULES : RBI ने क्रेडिट कार्डच्या संबंधात अनेक नियम केले असून, वेळोवेळी बँकांना देखील याबद्दल सूचना दिल्या आहेत. आता RBI ने सर्व क्रेडिट माहिती कंपन्यांना निर्देश दिले आहेत की, जेव्हा कोणतीही बँक किंवा NBFC एखाद्या ग्राहकाचा क्रेडिट रिपोर्ट तपासते, तेव्हा त्या ग्राहकाला एसएमएस किंवा ईमेलद्वारे याची माहिती पाठवणे आवश्यक आहे. क्रेडिट स्कोर संबंधी वाढत्या तक्रारींमुळे RBI ने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, ग्राहकाला त्याचा क्रेडिट रिपोर्ट तपासल्याची माहिती मिळणे अनिवार्य झाले आहे.
गुलाबी शरारा गाण्यावर शिक्षिकेचा डान्स बघा 👇
RBI ने दिलेल्या माहितीनुसार, जर ग्राहकाची कोणतीही विनंती नाकारली गेली, तर त्याचे कारण त्याला सांगणे आवश्यक आहे, जेणेकरून ग्राहकाला समजून बदल करता येतील. तसेच, क्रेडिट कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांना वर्षातून एकदा विनामूल्य पूर्ण क्रेडिट स्कोअर प्रदान करावा. यासाठी, त्यांच्या वेबसाइटवर एक लिंक प्रदर्शित करावी, ज्याद्वारे ग्राहकांना त्यांचा विनामूल्य संपूर्ण क्रेडिट अहवाल तपासता येईल. यामुळे ग्राहकांना त्यांचा CIBIL स्कोर आणि पूर्ण क्रेडिट हिस्ट्री वर्षातून एकदा कळेल.
सरकारी कर्मचाऱ्यांचा DA (महागाई भत्ता) 4 टक्के नाही तर इतके टक्के वाढणार!
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार, जर ग्राहक डिफॉल्ट होणार असेल तर त्याला आधी माहिती देणे आवश्यक आहे. कर्ज देणाऱ्या संस्थांनी सर्व माहिती एसएमएस किंवा ईमेलद्वारे ग्राहकास पाठवावी. तसेच, बँका आणि कर्ज देणाऱ्या संस्थांनी नोडल अधिकारी नेमावेत, जे क्रेडिट स्कोअर संबंधित समस्या सोडवतील.
जर क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीने ग्राहकाच्या तक्रारीचे 30 दिवसांत निराकरण केले नाही, तर त्यांना प्रतिदिन 100 रुपये दंड भरावा लागेल. कर्ज देणाऱ्या संस्थेला 21 दिवस आणि क्रेडिट ब्युरोला 9 दिवसांचा कालावधी दिला जाईल. जर बँकेने 21 दिवसांच्या आत क्रेडिट ब्युरोला माहिती दिली नाही, तर बँकेला नुकसान भरपाई करावी लागेल. त्यानंतरही 9 दिवसांच्या आत तक्रारीचे निराकरण न केल्यास, क्रेडिट ब्युरोला नुकसान भरपाई देणे बँकांना बंधनकारक असेल.