केंद्र सरकारने देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत, ज्यामध्ये गरीब आणि गरजू लोकांना विशेष लाभ दिले जातात. यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे मोफत रेशन योजना, ज्याअंतर्गत सर्व रेशन कार्डधारकांना रेशन पुरवले जाते.
मात्र, आता या योजनेत काही बदल करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि त्यांच्या आहारातील पोषणाच्या पातळीला सुधारण्यासाठी या योजनेत आवश्यक सुधारणा केल्या आहेत.
केंद्र सरकारकडून गोरगरीब जनतेसाठी रेशन कार्डधारकांना विनामूल्य अन्नधान्य पुरविण्याची योजना राबवली जाते.
पूर्वी रेशन कार्डधारकांना मोफत तांदूळ देण्यात येत असे, मात्र सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार आता मोफत तांदूळ दिला जाणार नाही. त्याऐवजी, सरकार रेशन कार्डधारकांना इतर 9 जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणार आहे.
रेशन दुकानात मिळणार ह्या 9 गोष्टी
केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेअंतर्गत सुमारे 90 कोटी लोकांना लाभ मिळतो, ज्यात गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन, आणि मसाले यांचा समावेश आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आणि आहारातील पोषणाच्या पातळीला सुधारण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनमानातही सुधारणा होण्याची सरकारला आशा आहे.