Post office Scheme : पोस्ट ऑफिस विविध वयोगटांसाठी अनेक बचत योजना उपलब्ध करून देते, ज्यामध्ये सुरक्षित गुंतवणूक आणि चांगला परतावा मिळतो. नियमित उत्पन्नाची गरज असल्यास, पोस्ट ऑफिसची मंथली इनकम स्कीम (एमआयएस) हा एक उत्तम पर्याय आहे. एकरकमी गुंतवणुकीनंतर, पुढील महिन्यापासूनच व्याजाद्वारे उत्पन्न सुरू होते.
POMIS (post office monthly income scheme)
पोस्ट ऑफिसच्या मंथली इनकम स्कीममध्ये (एमआयएस) सरकार ७.४% दराने व्याज देते. खाते उघडल्याच्या एक महिन्यानंतर व्याजाचा लाभ मिळतो, म्हणजेच नियमित उत्पन्नाची हमी दिली जाते. या योजनेत, फक्त १,००० रुपयांनी खाते उघडता येते. सिंगल खात्यात ९ लाखांपर्यंत आणि संयुक्त खात्यात १५ लाखांपर्यंत गुंतवणूक करता येते. योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणं आवश्यक आहे. १८ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकतात.
अशी करा गुंतवणूक
पोस्ट ऑफिस एमआयएसमध्ये गुंतवणूक करून दरमहा ५००० रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न कसे मिळवता येईल यासाठी एमआयएस कॅल्क्युलेटरचा वापर करता येतो. उदाहरणार्थ, ५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर दरमहा ३,०८३ रुपये, तर ९ लाख रुपयांवर ५५५० रुपये व्याज मिळते. जॉइंट अकाउंटमध्ये १५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर दरमहा ९२५० रुपये उत्पन्न मिळू शकते. योजनेत ५ वर्षांचा लॉक-इन कालावधी आहे, आणि गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास खातं बंद करून अनामत रक्कम नॉमिनीला दिली जाते.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
पोस्ट ऑफिस योजनेतील खाते मॅच्युरिटीपूर्वी बंद करण्यासाठी गुंतवणुकीच्या तारखेपासून एक वर्ष पूर्ण झाल्यावरच करता येते. खाते एक वर्ष आणि तीन वर्षांपूर्वी बंद केल्यास, गुंतवणुकीच्या रकमेतून २% वजा करून उर्वरित रक्कम दिली जाते. तीन वर्षांनंतर आणि पाच वर्षांपूर्वी खाते बंद केल्यास, १% वजा करून उर्वरित रक्कम दिली जाते.