Post Office Investment Scheme : या शासकीय हमी योजनेत कमीत कमी ५०० रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. एवढंच नाही तर या योजनेत कर सवलत देखील मिळते.
घराच्या बाहेर झोपला आणि रात्रीचा बिबट्या आला, व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद 👇
शासकीय योजनांमध्ये गुंतवणूक करताना सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund – PPF) हा उल्लेख आवर्जून केला जातो. टपाल कार्यालयाच्या (Post Office Schemes) लोकप्रिय योजनांपैकी ही एक योजना आहे. या शासकीय हमी योजनेत किमान ५०० रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. पीपीएफ योजना १५ वर्षांत परिपक्व होते. तसेच, यामध्ये कर सवलतींचाही लाभ मिळतो.
दीर्घकालीन गुंतवणुकीच्या माध्यमातून आपल्या मुलांच्या भविष्यासाठी मोठी रक्कम गोळा करायची असेल, तर ही योजना एक उत्तम पर्याय ठरू शकते. सध्या या योजनेवर ७.१ टक्के वार्षिक व्याज दिलं जातंय. जर तुम्ही दर महिन्याला या योजनेत मुलांच्या नावावर १००० रुपये जमा करत असाल, तर तुम्ही त्यांच्या भविष्यासाठी ८ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम गोळा करू शकता. त्यासाठी काय करावं लागेल ते समजून घेऊया.
जर तुम्ही या योजनेत दरमहा १,००० रुपये गुंतवले, तर एका वर्षात तुमची गुंतवणूक १२,००० रुपये होईल. ही योजना १५ वर्षांनी मॅच्युअर होईल, परंतु तुम्हाला दोनदा, ५-५ वर्षांच्या कालावधीत ती वाढवावी लागेल आणि सलग २५ वर्षे गुंतवणूक सुरू ठेवावी लागेल.
जर तुम्ही २५ वर्षांसाठी दरमहा १,००० रुपये गुंतवले, तर तुमची एकूण गुंतवणूक ३,००,००० रुपये होईल. मात्र, ७.१ टक्के व्याजदरामुळे तुम्हाला केवळ व्याजातून ५,२४,६४१ रुपये मिळतील आणि तुमची मॅच्युरिटी रक्कम ८,२४,६४१ रुपये असेल.
अधिक माहिती येथे पहा
पीपीएफ खात्याची मुदतवाढ ५-५ वर्षांच्या कालावधीमध्ये दिली जाते. पीपीएफ एक्सटेन्शनच्या बाबतीत गुंतवणूकदाराकडे दोन प्रकारचे पर्याय असतात पहिला, योगदानासह खात्याची मुदतवाढ आणि दुसरा, गुंतवणुकीशिवाय खात्याची मुदतवाढ. तुम्हाला योगदानासह खात्याची मुदतवाढ करायची असल्यास, तुमचं खातं बँक किंवा पोस्ट ऑफिस कुठेही असो, तिथे अर्ज द्यावा लागेल. लक्षात ठेवा की मॅच्युरिटीच्या तारखेपासून १ वर्ष पूर्ण होण्यापूर्वी हा अर्ज सादर करावा लागेल आणि मुदतवाढीसाठी फॉर्म भरावा लागेल. ज्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या शाखेत पीपीएफ खातं उघडण्यात आलंय, त्याच शाखेत फॉर्म जमा करावा लागेल. जर तुम्ही हा फॉर्म वेळेत सादर केला नाही, तर तुम्ही खात्यात पुढे योगदान करू शकणार नाही.