खुशखबर!! राज्यात डिसेंबर मध्ये 7500 पदांची पोलीस भरती

Police Recruitment News : राज्यात 2022 आणि 2023 मध्ये जवळपास 35 हजार पोलिसांची भरती झाल्यानंतर, आता पुन्हा डिसेंबरमध्ये सुमारे साडेसात हजार पोलिसांची भरती होणार आहे. यामध्ये मुंबई पोलीस दलासाठी 1200 पदे उपलब्ध असतील.

मुंबई महापालिकेत एकूण 1846 पदांची भरती, पगार 25,500/- ते 81,100/- रू.

2020-21 आणि 2023 या तीन वर्षात राज्यात पोलीस दलात भरती झाली नव्हती, ज्यामुळे पोलिसांची संख्या कमी होती. गेल्या दोन वर्षांत अनुक्रमे 18 हजार व 17 हजार पदांची भरती करण्यात आली, परंतु अजूनही सात ते आठ हजार पोलीस हवे आहेत. डिसेंबरमध्ये सुमारे साडेसात हजार पदांसाठी भरती होण्याची शक्यता आहे. सध्याची 14,471 पदांची भरती पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाने दिले आहेत, आणि सप्टेंबरपर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये भरती प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पोलिस भरती विषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

मागील भरती प्रक्रिया सप्टेंबरपर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना

गृह विभागाने सध्याची 14,471 पदांची पोलीस भरती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. 25 जिल्ह्यांत पोलीस शिपाई, 8 जिल्ह्यांत चालक शिपाई, आणि 5 जिल्ह्यांत बॅण्डसमॅनच्या लेखी परीक्षा झाल्या असून, उर्वरित जिल्ह्यांत सप्टेंबरपर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना आहेत. मुंबईत पावसामुळे भरती प्रक्रिया थोडी उशीराने सुरू झाली, परंतु ती लवकरच पूर्ण होईल. तसेच, राज्यातील 10 पोलीस प्रशिक्षण केंद्रांची क्षमता वाढवून सध्या 8,400 पोलिसांना प्रशिक्षण दिले जात आहे, ज्यात आगामी काळात दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे.

आणखी नवीन माहिती येथे जाणून घ्या

आगामी काळात डिसेंबर मध्ये होणाऱ्या भरती प्रक्रियेमुळे सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत अपयश आलेल्या उमेदवारांना आणखी एक संधी मिळणार आहे. त्यामुळे पोलिस भरती ची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Leave a Comment