स्वातंत्र्यदिनी नागपूरातील तहसील पोलिस ठाण्यात चार पोलिस कर्मचाऱ्यांनी “छोरा गंगा किनारे वाला” या गाण्यावर गणवेशात नाचल्याने त्यांना निलंबित करण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई करत डीसीपी झोन-3 यांच्या आदेशानुसार संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले.
पोलीस विभागातील शिस्तीचे महत्त्व लक्षात घेऊन, नागपूर पोलिसांनी गणवेशात फिल्मी गाण्यावर नाचणाऱ्या चार पोलिस कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांसाठी निलंबित केले आहे. या निलंबनादरम्यान त्यांना अर्धा पगार आणि महागाई भत्ता मिळणार असून, सर्व सरकारी अधिकार हिरावून घेण्यात आले आहेत. या काळात कोणताही व्यवसाय करण्याची परवानगी नसेल, आणि त्यांना दररोज मुख्यालयात हजर राहावे लागेल. त्यांनी त्यांच्या सर्व सरकारी किट आणि कागदपत्रे मुख्यालयात जमा करावी, असा आदेश देण्यात आला आहे.