Pink E Rickshaw Scheme : महिलांच्या स्वयंरोजगारासाठी ‘ई-पिंक रिक्षा’ योजना, प्रत्येक जिल्ह्यात 500 रिक्षा वितरण

Pink E Rickshaw Scheme : वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना महिला स्वयंरोजगारासाठी ‘ई-पिंक रिक्षा’ योजना विस्तारित करण्याची घोषणा केली.

गुलाबी रिक्षा हा भारतातील काही शहरांमध्ये महिला प्रवाशांसाठी सामान्य ऑटो रिक्षाचा पर्याय आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी आणि छळ-गैरवर्तन टाळण्यासाठी भारत सरकारने हा उपक्रम सुरू केला आहे. या रिक्षांमध्ये पॅनिक बटणे आणि जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीमसारख्या विशेष फीचर्स बसवण्यात आल्या आहेत. गुलाबी रिक्षा पूर्णपणे गुलाबी रंगाच्या असतात किंवा त्यांचे छत गुलाबी रंगाचे असते.

अजित पवार यांनी सांगितले की, प्रत्येक जिल्ह्यात 500 ई-रिक्षांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देण्यात येईल. महिलांसाठी स्वयंरोजगार आणि सुरक्षित प्रवासासाठी 10 हजार ‘पिंक ई-रिक्षा’ योजनेची घोषणा करण्यात आली आहे.

लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार ही योजना जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महिला आणि बालकल्याणासाठी राखीव 3 टक्के निधीतून जिल्हा व तालुका स्तरावर लागू करण्यात येईल. यामुळे प्रत्येक जिल्ह्यात 500 पिंक ई-रिक्षा उपलब्ध होतील.

अधिक माहिती येथे पहा

पिंक ई-रिक्षा योजना लागू करण्याची घोषणा नुकतीच झाली आहे. सध्या या योजनेसाठी अधिकृत वेबसाईट उपलब्ध नाही. तसेच अर्ज प्रक्रियेबद्दलची माहितीही अद्याप जाहीर केलेली नाही. मात्र, भविष्यात या योजनेसंबंधी सर्व अपडेट्स तुम्हाला कळवल्या जातील.

Leave a Comment