लाडकी बहिण योजनेच्या लाभात तांत्रिक कारण; 15 टक्के अर्ज बाद होणार

Majhi Ladki Bahin : राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत आतापर्यंत एक कोटी महिलांनी नोंदणी केली आहे. ही संख्या ऑगस्टच्या अखेरीपर्यंत दोन ते अडीच कोटीपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे.

8 लाख रुपये तेही फक्त 4 स्टेप मध्ये खात्यात जमा होणार

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत आतापर्यंत एक कोटी महिलांनी नोंदणी केली आहे. ऑगस्टच्या अखेरीपर्यंत ही संख्या दोन ते अडीच कोटीपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. नोंदणी केलेल्या महिलांच्या खात्यात राखी पौर्णिमेच्या दिवशी जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचा 3000/- रुपये भत्ता जमा होणार आहे.

आता घरबसल्या मिळणार पर्सनल लोन, या प्रमाणे करा अर्ज

सुरुवातीला नोंदणी करताना सर्व्हर आणि नेटवर्कच्या अडचणी येत होत्या, परंतु आता त्या समस्या दूर केल्या आहेत. महिला स्वतः अर्ज भरू शकतात किंवा अंगणवाडी सेविकांकडे किंवा सेतू कार्यालयात अर्ज भरू शकतात, असे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्थसंकल्पात 46 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यासाठी दहा हजार कोटी रुपये दिले आहेत. योजनेत दोन कोटी पन्नास लाख महिलांची नोंदणी अपेक्षित आहे, पण 10 ते 15 टक्के अर्ज तांत्रिक कारणांमुळे बाद होऊ शकतात, असे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

सध्या ‘नारीशक्ती दूत’ ॲपद्वारे अर्ज भरले जात आहेत, आणि महिना अखेरीपर्यंत नवीन पोर्टल सुरू करण्याचा विचार आहे. अनेक बँका महिलांचे स्वतंत्र खाते उघडण्यास तयार आहेत, आणि आधार जोडणी झाल्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

Leave a Comment