लाडक्या बहिणीच्या खात्यात येणार १ रुपया, नेमके कारण काय?

Ladki Bahin yojana : लाडकी बहीण योजनेला मोठा प्रतिसाद मिळाल्याने ती राज्यातील महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्याचे उद्दिष्ट साध्य करेल. राज्य सरकारच्या या उपक्रमामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढेल आणि समाजात त्यांचे स्थान अधिक सुदृढ होईल.

लाडकी बहीण योजनेची नोंदणी सुरु झाल्यानंतर पहिल्या २५ दिवसांतच १ कोटी ८० लाखांहून अधिक अर्ज सादर झाले आहेत. यामध्ये, १ कोटी ३० लाख अर्ज ऑनलाइन पद्धतीने तर ५० लाख अर्ज ऑफलाइन पद्धतीने प्राप्त झाले आहेत. राज्यातील अंदाजे २ कोटी ते २.५ कोटी महिला या योजनेसाठी पात्र ठरतील असा अंदाज आहे.

तांत्रिक पडताळणीचा भाग म्हणून 1 रुपया

महिलांच्या खात्यात थेट ३ हजार रुपये जमा करण्याआधी, सरकार तांत्रिक पडताळणीसाठी १ रुपया पाठवणार आहे. त्यामुळे महिलांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. “सरकारने १५०० रुपये महिना देणार होते, तर खात्यात १ रुपया कसा आला?” असा प्रश्न अनेक महिलांनी विचारला. यावर महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक अर्जदार महिलांच्या बँक खात्यात १ रुपया जमा करणार आहे. हा १ रुपया सन्मान निधी नसून, तांत्रिक पडताळणीचा भाग आहे.

या दिवशी जमा होणार 3,000/- रुपये

लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सर्व पात्र महिलांना हे पैसे रक्षाबंधनाच्या दिवशी मिळणार आहेत. अर्ज केलेल्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, त्यांच्याबँक खात्यात १७ ऑगस्ट २०२४ रोजी जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे मिळून ३,००० रुपये जमा होतील.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment