Maharashtra Rain Alert : राज्यातील काही जिल्ह्यांना IMD कडून अतिमुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Rain Alert : मान्सूनने पुन्हा जोर धरला असून, हवामान विभागाने महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर महाराष्ट्रातील विविध भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. आज हवामान विभागाने पुन्हा पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांत कोकणातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि वारेही वाहतील. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांसह मध्यम पाऊस पडेल असा इशारा दिला आहे. विदर्भात प्रति तास 30-40 किमी वेगाने वारे वाहतील.

आज मुंबईत दिवसभर ढगाळ वातावरण राहील आणि काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांसह मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हवामान विभागाने महाराष्ट्रात पावसासह वादळी वाऱ्याचा इशारा दिला आहे. वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किमी असेल. हवामान विभागानुसार, दोन जुलै रोजी मान्सूनने संपूर्ण देश व्यापला आहे, त्यामुळे आता सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अधिक माहिती येथे वाचा

Leave a Comment