LPG Price : सरकारने १ तारखेपासून नियमांमध्ये बदल केले आहेत ज्यामुळे आपल्या खिशावर परिणाम होतो. ऑगस्ट महिन्याची सुरुवात झाली आहे, आणि या महिन्यातही सरकारने काही बदल केले आहेत. एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदल केले असून, १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत.
परंतु, १४ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती कायम आहेत. १ ऑगस्टपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडर ८.५० रुपयांनी महागला आहे. IOCL वेबसाइटनुसार, दिल्ली ते मुंबई दरम्यान व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या नवीन किंमती १ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ६ वाजल्यापासून लागू करण्यात आल्या आहेत.
१ जुलैला तेल विपणन कंपन्यांनी एलपीजीच्या दरात कपात केली होती. त्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या होत्या. दिल्लीत १९ किलोच्या सिलेंडरची किंमत ३० रुपयांनी कमी होऊन १६७६ रुपयांवरून १६४६ रुपयांवर आली होती. कोलकात्यात ती १७८७ रुपयांऐवजी १७५६ रुपये, चेन्नईमध्ये १८४०.५० रुपयांवरून १८०९.५० रुपये, आणि मुंबईत १६२९ रुपयांवरून १५९८ रुपयांवर आली होती.
मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत आजपासून ७ रुपयांनी वाढून १६०५ रुपये झाली आहे, जी आधी १५९८ रुपये होती. चेन्नईमध्येही सिलेंडरची किंमत वाढली असून, आता १८१७ रुपये आहे, जी आधी १८०९.५० रुपये होती.दिल्लीमध्ये १९ किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत १६४६ रुपयांवरून १६५२.५० रुपये झाली आहे, म्हणजे ६.५० रुपयांची वाढ झाली आहे. कोलकातामध्येही व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत ८.५० रुपयांनी वाढली आहे. तिथे १९ किलोचा सिलेंडर आता १७६४.५० रुपयांना मिळत आहे, जी आधी १७५६ रुपये होती.
नवीन माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल नाही
१९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत सातत्याने बदल होत असताना, घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती मात्र कायम आहेत. महिला दिनानिमित्त केंद्र सरकारने १४ किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरवर १०० रुपयांची कपात केली होती. तेव्हापासून या सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. सध्या, दिल्लीत ८०३ रुपये, कोलकात्यात ८२९ रुपये, मुंबईत ८०२.५० रुपये, आणि चेन्नईमध्ये ८१८.५० रुपयांना घरगुती एलपीजी सिलेंडर उपलब्ध आहे.