LPG Gas Cylinder Price : 1 जुलैपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये कपात जाहीर केली आहे. लहान-मोठ्या व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर आता 30 रूपयांनी स्वस्त झाला आहे. बीपीसीएल आणि एचपीसीएल यांनी आज सकाळी नवे दर जाहीर केले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल नाही.
सर्वसामान्य लोकांसाठी खर्चाचे नियोजन करण्यासाठी पगाराची १ तारीख महत्त्वाची असते. या दिवशी काही वस्तू स्वस्त होतात तर काही महाग होतात. आता १ जुलैपासून व्यावसायिक गॅस सिलिंडर ३० रुपयांनी स्वस्त झाल्याने लहान व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गॅस कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडर 30 रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिल्लीत 19 किलोचा गॅस सिलिंडर आता 1,646 रुपयांना मिळेल, जो आधी 1,676 रुपयांना होता.
अधिक माहिती येथे पहा
विविध शहरातील नवे दर (व्यावसायिक गॅस )
मुंबईत 19 किलोच्या सिलिंडरची किंमत अगोदर 1,629 रुपये होती आता 1,598 रुपये आहे.
कोलकातामध्ये अगोदर 1,787 रुपयांना होता 1,756 रुपयांना गॅस सिलिंडर मिळेल.
तसेच चेन्नईमध्ये सिलिंडरची किंमत आता 1,809 रुपये आहे.
विविध शहरातील नवे दर (घरगुती गॅस )
दिल्लीत घरगुती सिलिंडरची किंमत 803 रुपये आहे, कोलकात्यात 829 रुपये, मुंबईत 802 रुपये, आणि चेन्नईमध्ये 818 रुपये आहे.
घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणत्याही प्रकारे बदल झालेले नाहीत.