गॅस धारकांनो ! हे काम करा, नाहीतर गॅस सिलिंडर मिळणार नाही

LPG Cylinder Update : गॅस धारकांनो ! हे काम करा, नाहीतर गॅस सिलिंडर मिळणार नाही.

तुम्ही ही घरगुती गॅस वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे, शेवट पर्यंत नक्की वाचा.

मागील काही दिवसांपासून सिलिंडरच्या स्फोटांच्या घटना घडत आहेत. त्यामुळे हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या तिन्ही पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडर धारकांसाठी केवायसी अनिवार्य केले आहे. मात्र अनेक ग्राहकांना याबाबत माहिती नाही.

KYC कशी करावी हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सध्या केवळ २५ टक्के ग्राहकांचे केवायसी पूर्ण झाले आहे आणि यासाठी २५ जुलै अंतिम तारीख आहे. त्यामुळे आता घरगुती सिलिंडर धारकांवर दबाव आहे. केवायसी न केल्यास सवलतीच्या दरात सिलिंडर मिळणे अवघड होईल.

ग्राहकांनी हे काम करा

ग्राहकांनी वितरकांकडे जाताना आधार कार्ड घेऊन जावे. ग्राहक क्रमांक सांगून थंब इम्प्रेशन किंवा छायाचित्र देऊन केवायसी अद्ययावत करावे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

केवायसी करण्यासाठी संबंधित वितरकाच्या कार्यालयात जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने थंब इम्प्रेशन किंवा छायाचित्र द्यावे लागणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे.

अनेक ज्येष्ठ नागरिकांची मुले परदेशात किंवा नोकरीसाठी दूर असतात आणि काहींना चालणे कठीण असते. त्यांचे गॅस कनेक्शन त्यांच्या नावावर असल्याने, वितरकाचा मेकॅनिक घरी येऊन थंब इम्प्रेशन घेतो. मात्र, नेटवर्क नसल्यामुळे अशा प्रकारे केवायसी पूर्ण होण्याचे प्रमाण केवळ १० टक्के आहे. तसेच, काही ज्येष्ठ नागरिकांचे थंब इम्प्रेशन व्यवस्थित होत नाही. अशा वेळी त्यांचे छायाचित्र घेऊन केवायसी पूर्ण करता येते.

Leave a Comment