local railway Accident : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही प्रवासी बंद दरवाजाच्या बाहेर उभे राहून प्रवास करताना दिसत आहेत. व्हिडिओत एकाच दरवाजावर चार प्रवासी लटकत असल्याचे स्पष्ट आहे. एक्सप्रेस ट्रेनमधील काही प्रवाशांनी हा व्हिडिओ काढला. यात एक व्यक्ती दरवाज्यावर लोंबकळताना खांबाला धडकून खाली पडतो, आणि ट्रेन पुढे निघून गेल्यामुळे शेजारील प्रवाशांना काहीच करता आले नाही.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. पाऊस आणि तांत्रिक बिघाडामुळे लोकल उशिरा धावतात, ज्यामुळे प्रवाशांना गर्दीतून जीवघेणा प्रवास करावा लागतो. असा एक प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसून आला आहे, ज्यामध्ये मुंबई लोकल मधून चालत्या ट्रेनमधून एक व्यक्ती पडला, पण त्याला वाचवण्याची संधी कोणालाही मिळाली नाही.
मुंबई लोकलमधील प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ठाण्याच्या पलिकडे, वसई-विरारपर्यंत, आणि पनवेलपर्यंत मुंबईचा विस्तार झाल्यामुळे, नोकरीच्या निमित्ताने मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी ट्रेनशिवाय सोयीचा पर्याय नाही. मेट्रो आणि रस्ते वाहतूक असली तरी तुलनेने ट्रेनचाच पर्याय सर्वांना सोयीचा वाटतो. परिणामी लोकलवरील ताण वाढत असून, अपघातांचे प्रमाणही वाढत आहे.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
हा व्हिडिओ २०२२ सालचा असून मध्य रेल्वेच्या कल्याण मार्गावर झालेल्या अपघाताचा आहे. अपघातग्रस्त व्यक्ती वाचला असून त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले. डेक्कन क्वीनमधील प्रवाशांनी हा अपघात मोबाईलमध्ये शूट केला होता.