दरमहा EMI शिवाय कर्ज मिळू शकतं का? तुम्हाला माहितीये का? अडचणीच्या काळात असे मिळवा कर्ज

अडचणीच्या वेळी अचानक पैशांची गरज भासल्यास लोक जवळच्या व्यक्तींकडून पैसे मागतात, परंतु हे शक्य नसल्यास पॉलिसी मोडणे किंवा पर्सनल लोन घेणे हा पर्याय असतो. पर्सनल लोन महाग असते कारण त्याचे व्याजदर जास्त असतात आणि दर महिन्याला मोठा EMI भरावा लागतो.

LIC पॉलिसीवर कर्ज घेतल्यास हे कर्ज स्वस्त पडते आणि परतफेड करणे सोपे असते. यामध्ये दरमहा EMI भरण्याचा ताण नसतो, आपण आपल्या सोयीनुसार परतफेड करू शकतो. यामुळे तुमची बचत संपत नाही आणि गरजाही पूर्ण होतात. एलआयसी पॉलिसीवर उपलब्ध कर्जाच्या सुविधेबद्दल अधिक जाणून घेऊ.

एलआयसी पॉलिसीवरील कर्ज सुरक्षित कर्जाच्या श्रेणीत येते कारण त्याची गॅरंटी तुमची लाइफ इन्शुरन्स पॉलिसी असते. त्यामुळे जास्त कागदपत्रांची गरज नसते आणि कर्ज लवकर मिळते. कर्जाची रक्कम ३ ते ५ दिवसांत मिळू शकते. या कर्जाचा फायदा म्हणजे पॉलिसी सरेंडर करण्याची गरज नसते, त्यामुळे विम्यातून मिळणारे फायदे कायम राहतात. पर्सनल लोनपेक्षा हे लोन स्वस्त असते आणि त्यात प्रोसेसिंग फी किंवा छुपे चार्जेस नसतात, ज्यामुळे अतिरिक्त खर्च वाचतो.

EMI भरायचे टेन्शनच नाही

एलआयसी पॉलिसीवर कर्ज घेतल्यास त्याची परतफेड सोपी असते. कर्जाचा कालावधी सहा महिन्यांपासून पॉलिसीच्या मॅच्युरिटीपर्यंत असू शकतो. त्यामुळे दरमहा ईएमआय भरण्याचे टेन्शन नसते. पैसे आल्यावर हळूहळू कर्ज फेडता येते. मात्र, वार्षिक व्याजाची भर पडत राहते. जर कर्ज ६ महिन्यांच्या आत फेडले तर ६ महिन्यांचे व्याज द्यावे लागेल.

असा करा अर्ज

LIC पॉलिसीवर कर्ज घेण्यासाठी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी अर्ज करू शकता.

ऑफलाइनसाठी तुम्हाला एलआयसी कार्यालयात जाऊन केवायसी कागदपत्रांसह अर्ज करावा लागेल.

अधिक माहिती येथे वाचा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, प्रथम एलआयसी ई-सेवांसाठी नोंदणी करा आणि आपल्या खात्यात लॉगिन करा. त्यानंतर तुम्ही आपल्या विमा पॉलिसीमधून कर्ज घेण्यास पात्र आहात की नाही हे तपासा. पात्र असल्यास, कर्जाच्या अटी, शर्ती, व्याजदर इत्यादी काळजीपूर्वक वाचा. अर्ज सबमिट करा आणि केवायसी कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करा.

Leave a Comment