घराच्या अंगणात बिनधास्त झोपला; अन् बिबट्या आला, चित्त थरारक व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

ठाणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. अंगणात शांत झोपलेल्या एका कुत्र्याची बिबट्याने शिकार केली आहे. बिबट्याने कुत्र्याला आपल्या जबड्यात धरून पळवून नेले आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील शेईगाव येथील ही घटना आहे. येथे बिबट्याचा मुक्त संचार दिसून येत आहे. रात्रीच्या वेळेस अंगणात बांधलेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला. गणपत अंतू तारमले या व्यक्तीने पाळलेल्या कुत्र्याला बिबट्याने आपल्या तावडीत घेतले.

यावरून हेच लक्षात येते की, मृत्यू कधी, कुठे, कसा, कोणत्या रूपात येईल हे सांगता येत नाही. असाच एक भयावह व्हिडीओ समोर आला आहे.

बिबट्याचा हा हल्ला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की कुत्रा अंगणात शांत झोपला आहे. अचानक एक बिबट्या तिथे येतो. कुत्रा उठून पळण्याच्या तयारीत असतो, पण बिबट्या त्याला पळण्याची संधीच देत नाही. कुत्रा उठून सावरेपर्यंत बिबट्या त्याला पकडतो आणि घेऊन जातो.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment