ladki bahin yojana : राज्यातील महिलांना मध्यप्रदेश (लाडली बहना योजना) सरकारच्या धर्तीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. राज्यातील पात्र महिलांना महिन्याला 1500/- रुपये मिळणार आहेत; परंतु या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र/अपात्र आहेत ते पाहुयात. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना अर्ज आणि हमीपत्र पहा.
अर्ज आणि हमीपत्र येथे डाऊनलोड करा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पुढीलप्रमाणे महिला अपात्र आहेत.
- कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे.
- महिलेच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नसावा.
- महिला स्वतः किंवा तिच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम/ मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नसावा.
- सदरील महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 1500/- रुपयांपेक्षा जास्त रक्कमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- महिलेच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार नसावा.
- तसेच कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य नसावा.
- महिलेच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसावी.
- सदरील महिलेकडे किंवा तिच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) नोंदणीकृत नसावे.
वरील प्रमाणे एकाही अटींमध्ये असणाऱ्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र आहेत.