लाडकी बहिण योजनेचे 2 महिन्याचे 3000/- रू. एकाच वेळी खात्यात जमा होणार

Ladki bahin yojana : लाडकी बहिण योजनेसाठी महिलांची 1 जुलै पासूनच अर्ज करण्यासाठी मोठी गर्दी झालेली दिसत आहे.

हीच गर्दी पाहून सरकारने अटी ही कमी केल्या आहेत. तसेच अर्ज करण्याचा कालावधी 15 दिवसांवरून दोन महिन्या पर्यंत केला आहे.

तसेच पात्र महिलांनी दोन महिन्यात कधी जरी अर्ज केला तरी पैसे मात्र दोन महिन्याचेच एकत्र मिळणार आहेत.

जी कोणी लाभार्थी महिला 31 ऑगस्टपर्यत अर्ज करतील त्यांना जुलै आणि ऑगस्ट 2 महिन्यांचे पैसे एकत्र मिळतील.

१ जुलैपासून योजना सुरू होताच, योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यात महिलांची झुंबड उडाली. आवश्यक कागदपत्रे जमा करताना महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. राज्यभर अनेक ठिकाणी भर पावसात तासन्‌तास रांगत महिलांना उभे राहावे लागले.

या सर्व प्रकाराने या योजनेतील अटीवरून राज्य सरकारवर आरोप-प्रत्यारोप झाले. या योजनेतील काही जाचक अटी शिथिल करण्याचीही मागणी राज्यभर सुरू झाली. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी बैठक घेतली. या बैठकीत योजनेतील अटींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानुसार या योजनेतील काही अटी शिथिल करण्याबाबत तसेच काही अटीत सुधारणा करण्याचा निर्णय झाला.

उत्पन्न, अधिवास दाखल्याची जाचक अट रद्द

या योजनेसाठी सर्वाधिक त्रासदायक ठरलेल्या उत्पन्न व अधिवास दाखल्याची अटच रद्द करण्यात आली आहे.

ज्यांच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे, त्यांना उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार नाही. मात्र, ज्यांचे शुभ – कार्ड (पांढरे) आहे, त्यांना मात्र उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे.

या योजनेसाठी द्याव्या लागणाऱ्या अधिवास दाखल्याची (डोमेसाईल सर्टिफिकेट) अट रद्द केली आहे. याखेरीज संबंधित महिलेला 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मदाखला या चार पुराव्यांपैकी एक पुरावा अधिवासासाठी जोडावा लागणार आहे.

परराज्यात जन्मलेल्या आणि राज्यातील पुरुषाबरोबर विवाह केलेल्या महिलेला तिच्या पतीचा जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एक दाखला सोबत जोडावा लागणार आहे. हे नसेल तर मात्र संबंधिताला अधिवास प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे.

Leave a Comment