Ladki bahin yojana update : राज्य सरकारने जाहीर केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या लोकप्रिय ठरत असून महिलांच्या कुटुंबातील पुरुष सदस्यही या योजनेसाठी कागदपत्रांची पूर्तता करत आहेत. योजनेसाठीची कागदपत्रे मिळवण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. सरकारने काही नियमांत बदल करुन ही योजना अधिक सुलभ केली आहे आणि अधिक महिलांना लाभ मिळावा यासाठी काही अटी व शर्तीत बदल केला आहे.
आता कुटुंबातील अविवाहित महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे, ज्यासाठी वय वर्षे 21 ते 65 पर्यंतची मर्यादा देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली असून अर्ज ऑनलाईन किंवा पंचायत समिती कार्यालयातील महिला व बालकल्याण विभागात करता येईल.
कुटुंबातील 2 महिला महिलांना लाभ
यापूर्वी कुटुंबातील केवळ विवाहित महिलांनाच लाभ मिळत होता, पण आता 21 वर्षे पूर्ण केलेल्या अविवाहित महिलांनाही लाभ मिळणार आहे. एका कुटुंबातील दोन महिलांना, म्हणजे एक विवाहित आणि एक अविवाहित महिलेला, योजनेचा लाभ मिळेल.
1 जुलैपासून पुढील 60 दिवसांत अर्ज करणार्यांना 1 जुलैपासूनचे पैसे मिळतील, आणि 1 ऑगस्टनंतर अर्ज करणार्यांना अर्ज केल्यानंतरच्या महिन्यापासून पैसे मिळतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.