Ladki Bahin yojana :लाडकी बहिण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील रक्कम लाभार्थींच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात ३ हजार रुपये मिळाल्यानंतर महिलांमध्ये दुसऱ्या टप्प्यातील रक्कम कधी मिळेल, याबद्दल मोठी उत्सुकता होती. अनेक महिलांनी लाडकी बहिण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील ४५०० रुपये मिळण्याची आतुरतेने वाट पाहिली होती. आता ही प्रतीक्षा संपली असून, लाडक्या बहिणींच्या बँक खात्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यातील ४५०० रुपये जमा करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे वितरण नागपूरच्या रेशीमबाग मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. योजनेच्या पहिल्या टप्प्यात १ कोटी ७ लाख महिलांच्या बँक खात्यांमध्ये ३ हजार २२५ कोटी रुपये जमा करण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यात ५२ लाख महिलांच्या बँक खात्यांमध्ये १५६२ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.
लाडकी बहिण लाभार्थी यादी अशी करा डाऊनलोड, ladki Bahin beneficiary list
ज्या महिलांचे अर्ज बाद झाले आहेत किंवा अर्ज भरणे बाकी आहेत, त्या महिला परत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज दाखल करू शकतात.
आता लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.
अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ येथे पहा
Ladki Bahin yojana official website
लाडकी बहिण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट होती, ज्यामुळे अनेक महिलांनी अर्ज सादर केले. ज्या महिलांना अर्ज मंजूरीचा संदेश प्राप्त झाला आहे, त्यांच्या बँक खात्यांमध्ये अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे. मात्र, काही कारणांमुळे सुमारे ५० हजार अर्ज बाद झाले आहेत. या अर्जदार महिलांना पुन्हा अर्ज करता येईल का, याबद्दल अनेकांच्या मनात शंका आहे.
परंतु अर्ज बाद झालेल्या महिलांना सुद्धा परत अर्ज करता येणार आहे आहे.
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात आले की नाही कसे तपासावे
लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात आले आहेत की नाही, हे तपासण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणत्याही पद्धतीचा वापर करू शकता.
बँक शाखा: तुम्ही तुमच्या जवळच्या बँक शाखेत जाऊन बँक कर्मचारी किंवा पासबुक अपडेट करून खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही हे पाहू शकता.
SMS सूचना: बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले असतील तर तुम्हाला बँकेकडून SMS द्वारे माहिती दिली जाईल. हा SMS तुम्ही तपासून खात्यात पैसे आले आहेत की नाही ते पाहू शकता.
बँकिंग मोबाईल अॅप: तुम्ही बँकेच्या अधिकृत मोबाईल अॅपमध्ये लॉगिन करून तुमच्या खात्याचा स्टेटमेंट किंवा शिल्लक तपासू शकता.
इंटरनेट बँकिंग: इंटरनेट बँकिंग वापरून तुमच्या खात्यात लॉगिन करा आणि खात्यातील शिल्लक किंवा ट्रांजेक्शन तपासून बघा.
एटीएम: एटीएममधून बॅलन्स इन्क्वायरीचा पर्याय निवडून तुमच्या खात्यातील शिल्लक तपासा.