लाडकी बहीण योजनेची अर्ज प्रक्रिया बंद, आता कुठे कराल अर्ज? नवीन GR नुसार मोठा बदल

महाराष्ट्र राज्यात महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्य, आरोग्य आणि पोषण सुधारणेसाठी तसेच कुटुंबातील त्यांची महत्त्वाची भूमिका मजबूत करण्याच्या उद्देशाने “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना राबविण्यात येत आहे.

शासन निर्णय दि. ०२ सप्टेंबर २०२४ नुसार, “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेत सर्व महिलांना सप्टेंबर २०२४ मध्ये नोंदणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी ११ प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्याची परवानगी होती. परंतु, अर्जांची संख्या मर्यादित होत असल्यामुळे आता केवळ अंगणवाडी सेविकेमार्फत अंगणवाडी केंद्रांवर अर्ज स्वीकारण्यास शासन विचाराधीन आहे.

शासन निर्णय येथे डाऊनलोड करा

संदर्भित शासन निर्णय दि. ०२ सप्टेंबर २०२४ नुसार, “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेत सप्टेंबर २०२४ मध्ये सर्व महिलांना नोंदणीची परवानगी देण्यात आली आहे. याआधी, दि. १२ जुलै २०२४ आणि दि. २५ जुलै २०२४ च्या शासन निर्णयांनुसार नागरी आणि ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका, समूह संघटक (CRP), मदत कक्ष प्रमुख, CMM, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक आणि आपले सरकार सेवा केंद्र या ११ प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्याची परवानगी देण्यात आली होती.

शासन निर्णय डाऊनलोड करा

परंतु, नवीन निर्णयानुसार आता केवळ अंगणवाडी सेविकांनाच अर्ज स्वीकृतीचे अधिकार देण्यात आले असून इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना दिलेले अधिकार रद्द करण्यात आले आहेत.

Leave a Comment