Ladki bahin 1st Installment : महाराष्ट्र राज्य सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना’ महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्वपूर्ण उपक्रम आहे. राज्य मंत्रिमंडळाने योजनेची अंमलबजावणी अधिक सुलभ करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.
लाभार्थी महिलांच्या याद्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा
लाडकी बहीण योजनेची पार्श्वभूमी
‘माझी लाडकी बहिन’ योजना महाराष्ट्र सरकारची महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आणि सामाजिक सुरक्षिततेसाठी सुरू केलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे. अंमलबजावणीत येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत योजनेच्या नियमांमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजना ताजे अपडेट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
15 ते 19 ऑगस्ट दरम्यान, जमा होणार 3,000/- रुपये
योजनेच्या त्वरित अंमलबजावणीसाठी मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान, पहिल्या आठवड्यातच लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दोन महिन्यांसाठी 3,000 रुपये थेट जमा केले जातील. अशी प्राथमिक माहिती आहे.
नवीन नियम आणि सुधारणा:
1. पोस्ट बँक खाते स्वीकृती: आता पोस्ट बँक खाते देखील योजनेचा लाभ घेण्यासाठी मान्य असेल, ज्यामुळे ग्रामीण भागातील महिलांसाठी लाभ घेणे सोपे होईल.
2. परराज्यातील महिलांसाठी सुविधा: परराज्यात जन्मलेल्या पण महाराष्ट्रात विवाह झालेल्या महिलांना त्यांच्या पतीच्या नोंदणीनुसार योजनेचा लाभ मिळेल.
3. गावस्तरीय समितीची भूमिका: गावस्तरीय समिती दर शनिवारी महिला लाभार्थ्यांची यादी वाचून आवश्यक सुधारणा करेल.
4. केंद्र सरकारच्या योजनांचा समावेश: केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळेल, मात्र त्यांनी ऑफलाइन अर्ज करावा लागेल.
अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
5. विवाह नोंदणीसंदर्भात लवचिकता: नवविवाहित महिलांसाठी, विवाह प्रमाणपत्रानुसार पतीचे रेशन कार्ड पुरावा म्हणून मान्य केले जाईल.
6. OTP कालावधीत वाढ: नोंदणी प्रक्रियेदरम्यान OTP चा कालावधी 10 मिनिटांपर्यंत वाढवण्यात आला आहे.