केरळ :
मधील वायनाड येथे ३० जुलै रोजी पहाटे भूस्खलन झाले. दुर्घटनेला चार दिवस उलटून गेले असले तरी ढिगाऱ्याखालून मृत आणि जिवंत लोकांना बाहेर काढण्याचे बचाव कार्य सुरु आहे.
शेकडो लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. केंद्र सरकारने राज्याला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
लष्कर आता मोबाईलच्या शेवटच्या लोकेशननुसार लोकांना शोधण्याचे काम करत आहे. लष्कर आणि बचाव पथक युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत.
एका मुसळधार पावसाच्या माऱ्याने आणि सलग ४ भूस्खलनाच्या घटनेमुळे चार गावे उद्ध्वस्त झाली आहेत.
अजूनही अनेक लोक बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्याचवेळी, हवामान खात्याने वायनाडमध्ये काल म्हणजेच २ ऑगस्ट रोजी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला होता.
सर्वत्र केवळ विध्वंसाची दृश्ये दिसत आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली, जलाशय पाण्याने भरले आणि झाडे उन्मळून पडली. या दुर्घटनेत नेमक्या किती लोकांचा मृत्यू झाला हे सांगणे अद्याप अवघड आहे.
सकाळी १० वाजून १५ मिनिटांच्या जमिनीखालून माेठे आवाज आले. या भागातील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. अधिकारी भूकंपीय हालचालीच्या नाेंदी तपासत आहेत.