Ganesh Utsav GR : महाराष्ट्र सरकारने ४ सप्टेंबर २०२४ रोजी गणेशोत्सवाच्या काळात गणेश भक्तांसाठी खास मोफत सुविधा देण्यासाठी शासन निर्णय (GR) निर्गमित केला आहे. हा निर्णय उत्सव काळात भक्तांना सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी विविध सुविधांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने घेतला आहे.
शासन निर्णय येथे डाऊनलोड करा
सन २०२४ च्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी राज्य शासनाने पथकरात सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक ५ सप्टेंबर २०२४ ते १९ सप्टेंबर २०२४ या कालावधीत मुंबई-बेंगलोर नॅशनल हायवे (NH-48), मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ आणि सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यावर ही सवलत लागू असेल. कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसना या पथकरातून सूट दिली जाणार आहे.
शासन निर्णय येथे डाऊनलोड करा
गणेशोत्सव २०२४ साठी कोकणात जाणाऱ्या वाहनांसाठी पथकर माफी देण्यासाठी विशेष स्टिकर्स स्वरूपातील पासेस जारी केले जातील. या पासेसवर गाडी क्रमांक, चालकाचे नाव इत्यादी माहिती नमूद करणे बंधनकारक असेल, आणि हे पास परतीच्या प्रवासासाठीही मान्य असतील.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेससाठी, संबंधित जिल्ह्यातील पोलीस विभाग किंवा प्रादेशिक परिवहन खात्यांकडून हे पासेस उपलब्ध करून दिले जातील. गौरी गणपतीसाठी रवाना होणाऱ्या सर्व बसेसना पथकर माफी लागू असेल, तसेच संबंधित वाहनांवर स्टिकर्स लावून त्यांची वाहतूक केली जाईल.
यासाठी पोलीस आणि परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात या पास सुविधांची आणि त्यांची उपलब्धता याबाबतची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यकतेनुसार अधिसूचना आणि जाहीर प्रसिध्दी करावी असे निर्देश दिले आहेत.