Free Gas cylinder : राज्य सरकारने अलीकडेच सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात महिलांसाठी एक महत्त्वाची योजना जाहीर केली आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी घरगुती गॅस सिलिंडरबाबत केलेली घोषणा राज्यातील लाखो कुटुंबांना दिलासा देणारी ठरणार आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत, वर्षभरात तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.
या योजनेअंतर्गत, पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्षभरात तीन गॅस सिलिंडर थेट जमा केले जातील. या माध्यमातून सरकार गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न करत आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे महत्त्व
महिला सक्षमीकरण: घरगुती खर्चात बचत झाल्यामुळे महिलांना इतर महत्त्वाच्या गरजांसाठी पैसे खर्च करता येतील, ज्यामुळे त्यांचे सक्षमीकरण होईल.राहणीमानात सुधारणा: मोफत गॅस सिलिंडर मिळाल्यामुळे कुटुंबांना इतर जीवनावश्यक वस्तूंवर खर्च करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारेल.स्वच्छ इंधनाच्या वापरास प्रोत्साहन: ही योजना अधिकाधिक कुटुंबांना एलपीजी गॅस वापरण्यास प्रोत्साहित करेल, जे पर्यावरणासाठी चांगले आहे.
फक्त यांनाच मिळणार मोफत सिलिंडर
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत विशेषतः बीपीएल (दारिद्रय रेषेखालील) शिधापत्रिकाधारक आणि केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांसाठी लागू असेल.
महिलांसाठी विशेष लाभ
राज्यातील सुमारे 56 लाख 16 हजार कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ही योजना खास महिलांसाठी तयार करण्यात आली आहे, कारण स्वयंपाकघराचा खर्च बहुतेक स्त्रियाच करतात. गॅस सिलिंडरच्या दरवाढीचा थेट परिणाम महिलांच्या आर्थिक नियोजनावर होतो. त्यामुळे ही योजना महिलांना आर्थिक ताण कमी करण्यास आणि इतर गरजांसाठी पैसे वाचवण्यास मदत करेल.