Free Gas Cylinder Update : राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर देण्यात येणार आहेत. हा लाभ मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे. राज्य सरकार अनेक लोककल्याणकारी योजना राबवत असून, या योजनेमुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.
फक्त यांनाच मिळणार 3 मोफत गॅस सिलिंडर
या योजनेचा लाभ फक्त प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील पात्र लाभार्थ्यांनाच मिळणार आहे. या लाभार्थ्यांना दरवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर मिळतील, ज्यासाठी प्रति सिलेंडर 830 रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा होतील. मात्र, हा लाभ मिळवण्यासाठी नागरिकांनी गॅस एजन्सीमध्ये जाऊन E-KYC पूर्ण करणे आवश्यक आहे. KYC पूर्ण न केल्यास लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलेंडर मिळणार नाहीत.
असे मिळतील गॅस सिलिंडर मोफत
राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबवली आहे, ज्याअंतर्गत पात्र महिलांना वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर दिले जातील. लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर खरेदी करून, नंतर त्यांच्या खात्यात केंद्र सरकारकडून 300 रुपये आणि राज्य सरकारकडून 530 रुपये अनुदान मिळणार आहे. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळू शकतो.
हे एक काम करा
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी E-KYC पूर्ण करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया एजन्सीमार्फत मोफत आणि सहज पूर्ण करता येते. प्रक्रिया न केल्यास लाभ मिळणार नाही. अडचणी आल्यास जिल्हा पुरवठा अधिकारी किंवा धान्य वितरण कार्यालयाशी संपर्क साधावा.