मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मोफत 3 गॅस सिलेंडर योजना सुरू, शासन निर्णय आला, फक्त या कुटुंबांना लाभ

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मोफत 3 गॅस सिलेंडर योजना सुरू, शासन निर्णय आला, फक्त या कुटुंबांना लाभ

शिंदे सरकारने महिलांसाठी आणखी एक आनंददायक निर्णय घेतला आहे. आज या निर्णयाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या योजनेचे नाव मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील ५२ लाख १६ हजार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच, लाडकी बहिण योजनेच्या पात्र कुटुंबांना वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत.

मात्र, या योजनेचा लाभ फक्त महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असलेल्या कुटुंबांनाच मिळेल. एका कुटुंबातील फक्त एकच महिला योजनेस पात्र असेल. एक महिन्यात एकाच गॅस सिलेंडरचा लाभ घेता येईल.

देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे आणि महिलांचे आरोग्य सुधारणे, तसेच त्यांना सक्षमीकरण देणे, या उद्देशाने केंद्र सरकारने २०१६ साली प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली. महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना या योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन देण्याचे काम तेल कंपन्यांच्या सहकार्याने सुरू आहे.

परंतु, महाराष्ट्रातील गरीब कुटुंबांना बाजार दराने गॅस सिलिंडर भरून घेणे आर्थिकदृष्ट्या कठीण आहे. तसेच, एक सिलिंडर संपल्यावर दुसरे सिलिंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकासाठी साधन नसल्याने, हे लोक वृक्षतोड करून पर्यावरणाची हानी करत असल्याचे सरकारच्या लक्षात आले आहे.

ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने २०२४-२५ या वर्षाच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली आहे. या योजनेनुसार प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे लाभार्थी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी यांना दरवर्षी ३ मोफत गॅस सिलेंडर पुनर्भरण (Refill) देण्यात येणार आहेत, असे शासन निर्णयात म्हटले आहे.

नवीन माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

शासन निर्णय

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील सुमारे ५२.१६ लाख लाभार्थ्यांना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र कुटुंबांना दरवर्षी ३ मोफत गॅस सिलेंडर पुनर्भरण (Refill) देण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना” या नावाने राबवली जाईल.

3 मोफत गॅस सिलेंडर करिता पात्रता

  • या योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर असणे आवश्यक आहे.
  • सध्याच्या स्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे ५२.१६ लाख लाभार्थी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळेल.
  • एका कुटुंबातील (रेशन कार्डनुसार) फक्त एकच लाभार्थी पात्र असेल.
  • हा लाभ फक्त १४.२ किलो वजनाच्या गॅस सिलेंडरच्या कनेक्शनसाठीच मिळेल.

असा मिळेल 3 गॅस सिलिंडर चा लाभ

  • प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यांमार्फत केले जाते. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत ३ मोफत सिलेंडरही तेल कंपन्यांमार्फत दिले जातील.
  • सध्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील गॅस सिलेंडरची संपूर्ण बाजारभावाची रक्कम (रु.८३०/-) ग्राहकांकडून घेतली जाते आणि नंतर रु.३००/- सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते.
  • त्या धर्तीवर, राज्य सरकारकडून देण्यात येणारी रु.५३०/- प्रति सिलेंडर रक्कम तेल कंपन्यांनी ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करावी. तेल कंपन्यांनी योजनेच्या लाभार्थ्यांची यादी त्यांच्या संकेतस्थळावर प्रकाशित करावी आणि दर आठवड्याला शासनास माहिती द्यावी.
  • एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी दिली जाणार नाही.

या योजनेची कार्यपद्धती

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरचे वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते, तसेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत 3 मोफत गॅस सिलिंडरचे वितरणही तेल कंपन्यांद्वारेच होईल.

केंद्र सरकारच्या रु. 300 अनुदानाच्या व्यतिरिक्त राज्य सरकार रु. 530 प्रति सिलिंडर लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करेल.

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना प्रति सिलिंडर रु. 830 थेट लाभ हस्तांतरणाद्वारे बँक खात्यात जमा केले जातील.

या योजनेत एका महिन्यात एकापेक्षा जास्त सिलिंडरसाठी अनुदान मिळणार नाही.

1 जुलै 2024 पासून पात्र लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल.

1 जुलै 2024 नंतर विभक्त केलेल्या रेशन कार्डधारकांना योजनेस पात्रता नाही.

Leave a Comment