बँकेत खाते नसलेल्या लाडक्या बहिणींना अश्या प्रकारे मिळणार लाभ

अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेत महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. या योजनेचा लाभ मिळावा म्हणून सरकारने काही नियम आणि अटी शिथिल करण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठीमागे काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाची बैठक घेतली, ज्यात लाडकी बहीण योजनेसाठी सहा महत्त्वाचे निर्णय घेतले. या योजनेसाठी नवीन नियम करण्यात आले आहेत आणि काही अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. राज्यभरात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून महिलांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले जात आहेत. तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन हे बदल केले आहेत.

बँकेत खाते नसलेल्या महिलांना असा मिळेल लाभ

ग्रामीण भागातील महिलांचे बँकेत खाते नसल्यामुळे त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यात अडचण येत होती. सरकारने हा प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता बँकेत खाते नसलेल्या महिलांसाठी पोस्टातील खाते ग्राह्य धरले जाणार आहे. यामुळे, बँकेत किंवा पोस्टात खाते असलेल्या महिलांना योजनेचा लाभ घेता येईल आणि सरकार त्यांचे पैसे जमा करू शकेल.

Leave a Comment