BSNL 5G Service : BSNL 4G सिमवर 5G, सर्वात स्वस्त डेटा आणि कॉलिंग

बीएसएनएलने 4G आणि 5G युजर्ससाठी सपोर्ट करणारी ओटीए सेवा आणि युसिम लाँच केली आहे. बीएसएनएलकडून 4G सेवा सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली असून, कंपनी 4G आणि 5G साठी यू-सिम नावाचे नवीन सिम कार्ड लाँच करत आहे. या युसिममुळे बीएसएनएल जिओ आणि एअरटेलच्या तुलनेत मागे राहणार नाही.

BSNL 5G सेवे विषयी अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यूएसआयएम म्हणजे युनिव्हर्सल सबस्क्रायबर्स आयडेंटिटी मॉड्यूल, ज्यामध्ये एक छोटी चिप असते आणि ती सामान्य सिमकार्डपेक्षा अधिक सुरक्षित आणि वेगळी असते. हे सिमकार्ड 4G आणि 5G युजर्ससाठी बीएसएनएलने विकसित केले असून, तुम्हाला 4G सिम वापरताना 5G सेवेसाठी नवीन सिम घ्यायची आवश्यकता नाही. बीएसएनएलने हे यू-सिम देशांतर्गत कंपनी पायरो होल्डिंग्सच्या सहकार्यानं विकसित केलं आहे आणि त्याचं उद्घाटन चंदीगडमध्ये केलं आहे.

रिपोर्टनुसार, बीएसएनएल 4G सेवा देशभरात पुढील 6 ते 8 महिन्यांत सुरू करू शकते, आणि मार्च 2025 पर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याची योजना आहे. बीएसएनएलची 5G सेवा 2025 च्या अखेरपर्यंत सुरू होऊ शकते. स्वस्त डेटा आणि कॉलिंगच्या मदतीने, बीएसएनएल ग्रामीण भारतातील डिजिटल दरी भरून काढण्याचं लक्ष्य ठेवत आहे, जे पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर भारताच्या उद्दिष्टाशी सुसंगत आहे.

Leave a Comment