बृहन्मुंबई महानगरपालिकेत लिपिक पदाच्या 1846 जागांसाठी भरती जाहिरात, पगार – 25,500/- ते 81,100/- रुपये

BMC Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी आहे, कारण मुंबई महानगरपालिकेत 1846 पदांसाठी भरती सुरू झाली आहे. देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या बीएमसीमध्ये ही मेगाभरती होत आहे. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. अधिक माहितीसाठी सविस्तर जाणून घ्या…

बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘कार्यकारी सहायक’ या पदासाठी 1846 जागा भरण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. पात्र उमेदवारांकडून 20 ऑगस्ट 2024 पासून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत, आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 सप्टेंबर 2024 आहे. अधिक माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाहिरात पाहता येईल.

PDF जाहिरात येथे पहा

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील गट ‘क’ मधील 1,846 ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे लिपिक) पदे सरळसेवेने भरली जाणार आहेत. या पदांसाठी सुधारित वेतनश्रेणी रु. 25,500-81,100 (पे मॅट्रिक्स-एम 15) अधिक भत्ते लागू आहेत. विविध आरक्षित प्रवर्गांसाठी आरक्षणानुसार या भरतीची प्रक्रिया होईल. सविस्तर माहिती जाहिरातीत उपलब्ध आहे.

मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर (https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn) या पदासाठीची जाहिरात उपलब्ध आहे. यामध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक दिलेली आहे. उमेदवार 20 ऑगस्ट 2024 पासून 9 सप्टेंबर 2024 रात्री 11:59 वाजेपर्यंत अर्ज भरू शकतात.

अधिकृत संकेतस्थळ येथे पहा

उमेदवारांनी जाहिरातीतील सर्व सुचना काळजीपूर्वक वाचून त्यांचे पालन करावे. ऑनलाईन अर्ज विहित वेळेत भरून सादर करावा आणि अर्जाची प्रिंट काढून ठेवावी.

मार्गदर्शनासाठी 9513253233 हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध आहे, ज्यावर सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत संपर्क साधता येईल.

Leave a Comment