तिरूपती बालाजी मंदिराच्या प्रसादात वापरल जाणार तेल भेसळयुक्त असल्याच समोर आल आहे. इतर तेलासह , माश्याच तेल ,आणि जनावरांची चरबी आढळल्याच समोर आल आहे.
हे प्रकरण समोर कधी आल ?
९ जुलै रोजी मंदिर बोर्डने तिरुपती बालाजी मंदिरात दिलेल्या प्रसादाच्या लाडूसाठी वापरण्यात आलेल्या तुपाचे नमुने गुजरातमधील पशुधन लॅबमध्ये पाठवले आणि १६ जुलै रोजी लॅबचा अहवाल आला
या अहवालात तुपात भेसळ असल्याचं आढळलं. राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डच्या फूड लॅब काल्फने (CALF) सांगितलं की, प्रसादम लाडू प्राण्यांची चरबी आणि माशांच्या तेलापासून तयार केलेल्या तुपात बनवले जात होते. CALF गुजरातच्या आनंद येथील एनडीडीबी (नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड) एक विश्लेषणात्मक प्रयोगशाळा आहे.
जाणून घेऊ तिथल्या सरकारच काय मत आहे ?
तिरुपती बालाजी मंदिरात दिलेल्या जाणाऱ्या लाडूच्या प्रसादावरुन आंध्र प्रदेशात राजकारण तापलं आहे. प्रसादासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपाबाबतचा अहवाल समोर आला आहे.
प्रसादाच्या लाडूसाठी वापरलेल्या तुपात माशांचं तेल आणि प्राण्यांच्या चरबीचा वापर केल्याचं अहवालात सांगण्यात आलं आहे. या घटनेनंतर देशभरात खळबळ माजली असून या मंदिराचं विश्वस्त मंडळ तातडीने बरखास्त करण्याची मागणी केली जात आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मागील सरकारने तिरुपती बालाजी मंदिरात मिळणाऱ्या प्रसादाच्या लाडूमध्ये तुपाऐवजी जनावरांच्या चरबीचा, माशाच्या तेलाचा वापर केला गेला असल्याचा आरोप केला आणि एकच खळबळ माजली. प्रसादात चरबी ?