बदलापुरातील एका प्रसिद्ध शाळेतील चार वर्षांच्या दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदे याचा आज एन्काऊंटर करण्यात आला. आज कळव्यात त्याचा पोलिसांच्या गोळीने शेवट झाला.
बदलापूरमधील चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणतील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी एन्काऊन्टर करण्यात आला आहे. ठाणे पोलिसांना अक्षय शिंदे याची ट्रान्झिट रिमांड मिळाली होती.
तळोजा तुरुंगातून त्याला ठाणे पोलीस घेऊन जात होते. मुंब्रा आणि कळव्याच्या दरम्यान अक्षयने पोलिसांकडील रिव्हॉल्व्हर हिसकावून घेत पोलिसांवर गोळीबार केला.
अक्षयच्या आईनं केलेल्या दावा :
अक्षयला कोणीतरी चिठ्ठी लिहून दिली होती. ती त्याच्या खिशात होती. तो दाखवत होता, मात्र मला काही दिसलं नाही. इकडच्याच मुलांनी ती दिल्याचं त्याने सांगितलं होतं.
त्याला वाचता येत नाही, अर्धवट शाळा शिकलाय त्यामुळे चिठ्ठीत काय लिहिलं होतं ते त्याला माहिती नव्हतं.
त्याने मला वाचायला दिली होती. तीनवेळा आम्ही भेटलो होतो. त्याने मला सांगितलं की मी हा गुन्हा केलेला नाही. मी त्या मुलींना बोटही लावलं नाही असं त्याने म्हटलं होतं.
तळोजा जेलमध्ये गेल्या सोमवारी पोलिसांनी भरपूर मारलं असं अक्षयने सांगितलं. माझ्या मुलाला फटाकेही फोडता येत नाही. पैसे देऊन त्याला मारून टाकलंय, असा दावा अक्षयच्या आईनं केलाय.
अक्षयच्या आईनं केलेल्या दाव्यामुळे त्याला तुरुंगात चिठ्ठी कुणी पाठवली? त्यामध्ये नेमकं काय होतं हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.