आनंदाची बातमी – अटल पेन्शन योजनेचे 5 ऐवजी 10 हजार खात्यात जमा होणार

Atal pension Yojana news : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या एनडीए सरकारचा पहिला अर्थसंकल्प 23 जुलैला सादर होणार आहे. या अर्थसंकल्पात सामाजिक सुरक्षा योजनांची व्याप्ती वाढवली जाऊ शकते, ज्यामध्ये आयुष्मान भारत योजना आणि अटल पेन्शन योजना यांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या योजनांबद्दल महत्वाची घोषणा करू शकतात, अशी वार्ता आहे.

केंद्र सरकार अटल पेन्शन योजनेतील (APY) किमान पेन्शन दुप्पट करण्याचा विचार करत आहे. सध्या या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 1,000 ते 5,000 रुपये मासिक पेन्शन मिळते. रिपोर्ट्सनुसार, सरकार ही रक्कम वाढवून 10,000 रुपये करण्याची शक्यता आहे, ज्यामुळे वृद्धांना थेट फायदा होईल. तथापि, मिळणारी पेन्शन गुंतवलेल्या रकमेवर अवलंबून असते.

अटल पेन्शन योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेत 18 ते 40 वर्षे वयोगटातील व्यक्ती दरमहा 42 ते 210 रुपये प्रीमियम भरू शकतात. वयाच्या 60 वर्षांनंतर त्यांना दरमहा 1,000 ते 5,000 रुपये पेन्शन मिळते. प्रीमियम वाढत्या वयानुसार वाढतो. 20 जूनपर्यंत 6.62 कोटी लोकांनी या योजनेत खाते उघडले आहे.

अधिक माहिती येथे वाचा

23 जुलै 2024 रोजी सादर केल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पात घोषणा केली जाऊ शकते.

Leave a Comment