आनंद दिघे दिव्यांग योजना’ मार्फत दिव्यांगांना मिळणार दरमहा 3,000 रुपये

Anand Dighe Divyang Yojana : आनंद दिघे दिव्यांग योजना’ मार्फत १८ वर्षांवरील ४०% दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना दरमहा १,००० रुपये दिले जातील, जे दर सहा महिन्यांनी एकत्रित ६,००० रुपये मिळतील, म्हणजे वार्षिक १२,००० रुपये. ८०% पेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना दरमहा ३,००० रुपये मिळतील, जे सहा महिन्यांनी एकत्रित १८,००० रुपये दिले जातील.म्हणजेच वार्षिक ३६,००० रुपये मिळतील.

अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

या दोन्ही गटातील दिव्यांगांना पुढील पाच वर्षांसाठी हा लाभ दिला जाईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग व्यक्तीकडे पिवळे किंवा निळे वैश्विक ओळखपत्र (UIAD कार्ड) असणे आवश्यक आहे.

दिव्यांग व्यक्तींनी अर्ज कसा करावा

आनंद दिघे दिव्यांग योजने अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कायमस्वरुपी रहिवाशी असलेल्या दिव्यांगांकडून अर्ज मागवले जात आहेत. पात्रता निकष, अटी, शर्ती, आवश्यक कागदपत्रे आणि अर्जाचा नमुना महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अर्ज नमुना पाहण्यासाठी https://portal.mcgm.gov.in वर About BMC – Departments – Department Manuals – Assistant Commissioner Planning – Docs – ‘धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना (२०२४-२५ ते २०२८-२९)’ लिंकवर क्लिक करा.

अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

दिव्यांग व्यक्तींच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी आणि त्यांना आर्थिक मदत पुरवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने ‘धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य’ योजना सुरू केली आहे. ही योजना ४० ते ८० टक्के दिव्यांग असलेल्या व्यक्तींना समर्पित आहे. सन २०२४-२५ ते २०२८-२९ या पाच वर्षांच्या कालावधीत, या योजनेअंतर्गत दरमहा एक ते तीन हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कायमस्वरूपी रहिवासी असलेल्या दृष्टीहीन, कर्णबधीर, अस्थिव्यंग, मनोविकलांग, आणि इतर शारीरिक व्यंग असलेल्या दिव्यांग व्यक्तींना सामान्य जीवन जगता यावे, योग्य औषधोपचार आणि आहार मिळावा, तसेच अर्थार्जनाच्या संधींमध्ये वाढ व्हावी यासाठी ‘धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ महानगरपालिकेच्या नियोजन विभागाद्वारे दिला जाणार आहे.

अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत नाही. सर्व कागदपत्रांसहित पूर्ण भरलेले अर्ज सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत संबंधित विभाग कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी केले आहे.

Leave a Comment