Aadhaar Update 2024 : भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने नागरिकांना आधार कार्ड अपडेट करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून आधारशी संबंधित फसवणूक टाळता येईल. भारतातील बहुसंख्य लोकांकडे आधार कार्ड असून, शासनाच्या अनेक लोककल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार आवश्यक आहे.
भारतात आधार कार्डशी संबंधित फसवणूक टाळण्यासाठी, भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने नागरिकांना आधार कार्ड अपडेट करण्याचं आवाहन केलं आहे. तुमचं आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा जुनं असल्यास आणि कधीही अपडेट केलेलं नसेल, तर ते त्वरित अपडेट करण्याचा सल्ला यूनिक आयडेंटिफिकेशन ऑथॅरिटी ऑफ इंडियाने दिला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती ‘आधार’च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. आधार कार्ड अपडेट केल्यामुळे त्याचा वापर अधिक सोपा आणि अचूक होतो, असं सूचनांमध्ये नमूद आहे.तुम्ही तुमचं आधार कार्ड जवळच्या आधार केंद्रात जाऊन किंवा ऑनलाइन पद्धतीनेही अपडेट करू शकता. आधार कार्डवरील काही माहिती ऑनलाइन पद्धतीने दुरुस्त करता येते. ही सेवा 14 सप्टेंबर 2024 पर्यंत मोफत आहे.
मोफत आधार अपडेट करण्यासाठी पुढे प्रोसेस पहा
- आधार कार्ड ऑनलाईन अपडेट करण्यासाठी, https://myaadhaar.uidai.gov.in या वेबसाईटवर लॉग इन करावे.
- आधार नंबर आणि केपचा टाकून, सेंड ओटीपीवर क्लिक करा. मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून लॉग इन करा.
- MY Adhar पेजवर, ‘online update service’ पर्याय निवडून, ‘update Adhar Online’ रकान्यावर क्लिक करा.
- या पोर्टलवरून तुम्ही तुमचं नाव, जन्मतारीख, लिंग, आणि पत्ता अपडेट करू शकता.
जर तुम्हाला मोबाईल नंबर, ई-मेल, किंवा बायोमेट्रिक डेटा अपडेट करायचा असेल, तर नजीकच्या आधार सेवा केंद्राला भेट देणं आवश्यक आहे. आधार अपडेट करण्यासाठी 50 रुपये शुल्क लागेल, आणि तुम्हाला एक सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर मिळेल, ज्याचा वापर करून तुम्ही अपडेटचं स्टेटस पाहू शकता. प्रक्रिया 30 दिवसांत पूर्ण होईल आणि याची माहिती एसएमएसद्वारे दिली जाईल.
आधार अपडेट करण्यासाठी ‘Proceed to Update Aadhar’ पर्यायावर क्लिक करा. नाव, जन्मतारीख, लिंग, किंवा पत्ता यापैकी आवश्यक माहिती निवडा. उदाहरणार्थ, पत्ता अपडेट करण्यासाठी ‘Address’ पर्याय निवडा. त्यानंतर, तुमचा सध्याचा पत्ता ‘Current Details’ मध्ये दिसेल आणि ‘Details to be Updated’ मध्ये नवीन माहिती भरावी. ही माहिती इंग्रजीत आणि मराठीत भरा, आणि नंतर पिन कोड टाकल्यावर राज्य व जिल्ह्याचं नाव आपोआप येईल. शेवटी, गाव आणि पोस्ट ऑफिस निवडा.
‘Select Valid Supporting Document Type’ या रकान्यातून योग्य कागदपत्र निवडा, आणि ‘View Details and Upload Documents’ वर क्लिक करा. स्क्रीनवर आलेली सूचना वाचून, ‘Continue to Upload’ वर क्लिक करा. दस्तावेज अपलोड केल्यानंतर, ‘Next’ वर क्लिक करा.तुम्ही अपडेट केलेली माहिती आता स्क्रीनवर दिसेल. ती वाचून, दोन्ही पर्यायांवर टिक करून ‘Next’ वर क्लिक करा. 50 रुपये शुल्क भरा, आणि ‘Make Payment’ वर क्लिक करा.
पेमेंट डेबिट/क्रेडिट कार्ड, यूपीआय, नेटबँकिंग, पेटीएम किंवा व्हॉट्सअपद्वारे करू शकता. पेमेंट यशस्वी झाल्याची सूचना स्क्रीनवर दिसेल. ‘Download Acknowledgement’ वर क्लिक करून पेमेंटची पावती पीडीएफमध्ये डाऊनलोड करा. पावतीवर तुमची जुनी व अपडेट केलेली माहिती नमूद असेल. आधारच्या वेबसाईटनुसार, पुढील 30 दिवसांत तुमचं आधार कार्ड अपडेट होईल.